भुसावळात महाराणा प्रताप यांना अभिवादन.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल महाराणा प्रताप चौकात राजपूत समाज बांधवांनी महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. हिंदूसूर्य,वीर शिरोमणी, मेवाड अधिपती,परम प्रतापी महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमीत्त भुसावळातील महाराणा प्रताप चौकात विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम महाराणा प्रताप चौकात पुजन करण्यात आले, कंडारीचे नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील यांनी पुजन केले. त्यानंतर पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करण्यात आले. दामोदर राजपूत,रणजित राजपूत,ललित मराठे , अभिजित पाटील,चंदू चौव्हान,नितीन पाटील,विक्की राजपूत,सोनी ठाकूर,किरण राजपूत,पोमेश राणे,श्याम गोविंदा,भूषण पाटील,पवन चौधरी यांच्यासह राजपूत समाज बांधव उपस्थित होते. फोटो कॅप्शन – महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांना अभिवादन करतांना दामोदर राजपूत,रणजित राजपूत,अभिजित पाटील,चंदू चौव्हान,नितीन पाटील,ललित मराठे , विक्की राजपूत,सोनी ठाकूर,किरण राजपूत,पोमेश राणे,श्याम गोविंदा,भूषण पाटील,पवन चौधरी आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *