भुसावळात चाकुचा धाक दाखवत ढाबा मालकास लुटले ; 7 हजार रोकड़ घेवून पोबारा ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घ्यावा अशी धमकी देत ढाबा मालकावर चाकू हल्ला करीत गल्ल्यातील 7000 रुपये चोरुन नेल्या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात सहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहरातील नॅशनल हायवे नंबर सहा जवळ पंजाब खालसा ढाबा येथे दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास तीघे जण आले व त्यांनी
चाकू काढून सारंगधर महादेव पाटिल यांना म्हणाला की तू माझ्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला मागे गुन्हा दाखल केला आहे तो मागे घे ,असे म्हणाला व यावेळी आरोपी आशिख बेग अस्लम बेग मिर्झा उर्फ बाबा काल्या,समीर पूर्ण नाव माहीत नाही.राहणार खडका रोड अन्सारउल्ला मस्जिद समोर भुसावळ,नईम पूर्ण नाव माहीत नाही व त्याच्या सोबत इतर तीन लोकांनी ढाब्यामध्ये अनधिकृतपणे करून ढाब्यामधील सामानाची तोडफोड करून तसेच काउंटर टेबलच्या गल्ल्यातून रोख रक्कम 7,000 चोरून नेले अशी फीर्याद याप्रकरणी सारंगधर महादेव पाटील वय 48 राहणार गुंजाळ कॉलनी, खडका रोड भुसावळ यांनी दिल्यावरून
बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग -5 गुरुन 24/2021 भादवी कलम 394,452, 427,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो कॉ नेव्हील बाटली करीत आहे
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत ,सपोनि मंगेश गोटला यांनी भेट दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *