भुसावळ (प्रतिनिधि )-
भुसावळ शहरातील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर चौकात चोरुन गुटखा व सुगंधी पान मसाल्याची चोरुन विक्री केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे ताब्यातुन एकुण 10,373/- रु.किंमतीचा गुटखा व सुगंधी पान मसाला जप्त करण्यात आला .
शहरातील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर चौकात एक पान टपरीवाला इसम हा स्वत:च्या फायदया करीता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या विमल गुटखा पान मसाला व तंबाखु गैरकायदा कब्जात बाळगुन चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहीती
पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी ,पोलीस उपअधिकारी सोमनाथ वाघचौरे ,पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि.अनिल मोरे , स.पो.नि मंगेश गोटाले, स.पो.नि कृष्णा भोये ,स.पो.नि गणेश धुमाळ , सफौ.तस्लीम पठाण, कृष्णा देशमुख पो.ना रविंद्र बि-हाडे,उमाकांत पाटील पो.कॉ. विकास सातदिवे,ईश्वर भालेराव,चेतन ढाकणे,सुभाष साबळे,योगेश माळी, जावेद शाह,प्रणय पवार अश्यांनी दिनांक 2.12.2020 रोजी 3:30 वा सुमारास लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव दिलीप तुळशीराम जावळे वय – 55 रा.गंगाराम प्लॉट भुसावळ असे सांगितले त्यांची टपरी स्विट पान मसाला या टपरीची बारकाईने तपासनी केली असता त्या टपरीत
6,545/- रु.किं.चा केशरयुक्त पान मसाल्याचे मोठे 35 पाकीटे,
2,574 /- रु.किं.चा केशरयुक्त पान मसाल्याचे लहान 13 पाकीटे, 924/- रु किमतीचे व्ही 1 सुगंधीत तंबाखुचे मोठे 28 पाकीटे, 330/- रु.कि.चा व्ही 1 सुगंधीत तंबाखुचे लहान 15 पाकीचे असा एकुण 10,373/- रु.किंमतीचा गुटखा व सुगंधी पान मसाला माल मिळुन आल्याने त्यावर पो.कॉ कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादी नुसार भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग 6 गु.र.न 954 /2020 भा.द.वी क.328,188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि.कृष्णा भोये सर करीत आहे



