सुदृढ आरोग्यासाठी वेळोवेळी तपासणी केली पाहिजे -डॉ वंदना वाघचौरे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना गरजेचे आहे परंतु या विषाणूला घाबरून चालणार नाही शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन केल्यास निश्चितपणे यावरती आपण मात करू शकतो आपण आजारी पडल्यास आजार अंगावर न काढता त्यावर डॉक्टरांकडून योग्य उपचार घेतले पाहिजे यामुळे निरोगी व सुदृढ आरोग्य लाभत असल्याचे प्रतिपादन डॉ वंदना वाघचौरे यांनी केले
आर्या फाउंडेशन संचालित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच हिरकणी महिला मंच यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दुपारी 2 ते 5 यावेळी आरोग्य शिबिराचे अयोजन करण्यात आले होते.
भुसावळ शहरातील रजा टॉवर खड़का रोड परिसरातील बरेच नागरिक भीती पोटी कोरोना काळात घरा बाहेर पडत नव्हते व घाबरत होते, त्या मुळे त्रस्त असलेल्या महिला हॉस्पिटल मध्ये जात नव्हत्या ,अशा नागरिकांच्या आग्रहाखातर व महिलांच्या तपासणी साठी खड़का रोड परिसरातील एम.आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापण समितीतिल प्रा.अंजुम खान यांनी पुढाकार घेत मद्त करत महिला आरोग्य तपासणीची व्यवस्था करून दिली.
या प्रसंगी आर्या फाउंडेशन चे अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे यांनी
कोरोना काळात स्वतःसोबत समाजातील लोकांचा बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्स चे पालन करून मास्क लावणे महत्वपूर्ण आहे ,तरच आपला बचाव होऊ शकतो हे उपस्थित महिलांना पटुवून दिले,
यावेळी हिरकिणी महिला मंच च्या अध्यक्ष प्रा निरंजना तायडे – साळवे यांनी महिला सक्षमीकरनाचे महत्व सांगितले.तसेच शिबिरात महिलांनी आरोग्यची काळजी कशी घ्यावी हे सांगत डॉ. वंदना वाघचौरे व डॉ, अविनाश गवळी यांनी सोशल डिस्टेन्स चे पालन करत फक्त 50 महिलांची तपासणी केली,
या प्रसंगी हिरकिणी महिला मंच च्या उपाध्यक्ष सुवर्णा इंगळे,सचिव पौर्णिमा मसाने
सहसचिव सरोजिनी रामटेके , सल्लागार अॅड़ मनीषा बविस्कर मुख्य व्यवस्थापक बबिता सिंग, तसेच जयश्री इंगळे काजल गवई यांची प्रमुख उपस्थिति होती.
शिबिराच्या यशस्वीते साठी एम आय तेली स्कूलचा स्टाफ तसेच अध्ययन पैरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल स्टाफ आणि संपूर्ण हिरकिणी महिला मंच व ग्रुप यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *