भुसावळात शांती नगर परीसरात चोरी; चोरटे फरार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील शांती नगर भागात
सोमानी गार्डन परीसरातील रहिवासास असलेले बोदवड पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी दिनेश झोपे यांचे घरात
बुधवारी मध्यरात्रीचे सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ माजवत चोरी
करून पोलिस व नागरीकांच्या हातावर तुरी देवून पोबारा केल्याची घटना येथे घडली .

शहरातील शांती नगरातील सोमाणी गार्डन परीसरातील रहिवासी बोदवड पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी दिनेश झोपे राहतात. रूईखेडा येथे ते गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप तोडताना कडी-कोयंडा भिंतीतून निखळल्याने जोरदार आवाजाने शेजारी राहणारे बापू पाटील यांना जाग आली. बुधवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर चोरट्यांनी मुद्देमालाचा शोधाशोध करताना सामानाची फेकाफेक केली. कपाटात असलेले सोन्याचे 7 ते 8 ग्रॅमचे दागिणे मिळाल्यानंतर चोरटे पळ काढणार तो कॉलनीतील लोक मोठ्या प्रमाणावर जमले तर शहर पोलिसांनाही माहिती कळवल्यानंतर त्यांची काही मिनिटात धाव घेतली मात्र याचवेळी चोरटे पळाले, चोर पळाले असा गोंधळ सुरू झाल्याने घोळका आवाजाच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी पोलिस व नागरीकांच्या हातावर तुरी देत पळ काढला. रात्री या परिसरातील माजी नगरसेवक शेखर इंगळे, अ‍ॅड.चरणसिंग, प्रकाश जोशी, प्रदीप जोशी, बापू पाटील, अजीत सरोदे, ऋषी पाटील, रूपम सरोदे, यशवंत भोळे, श्रेयस इंगळे आदींसह कॉलनीतील नागरीकांनी धाव घेतली होती.
एखाद्या सिनेमाचे कथानक असावे अशीच ही घटना घडली. चोर पळाले… चोर पळाले म्हणत घोळका नागरीकांच्या आवाजाच्या दिशेने धावताच चोरट्यांनी पोलिस व नागरीकांच्या हातावर तुरी देत पळ काढला. या घटनेत चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा ग्रॅम वजनाचे दागिने लांबवल्याचे समजते .
दिनेश झोपे हे रूईखेडा येथे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप तोडताना कडी-कोयंडा भिंतीतून निखळल्याने जोरदार आवाजाने शेजारी राहणारे बापू पाटील यांना जाग आली. बुधवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर चोरट्यांनी मुद्देमालाचा शोधाशोध करताना सामानाची फेकाफेक केली. कपाटात असलेले सोन्याचे 7 ते 8 ग्रॅमचे दागिणे मिळाले व चोरट्यानी पळ काढला .तो कॉलनीतील लोक मोठ्या प्रमाणावर जमले तर शहर पोलिसांनाही माहिती कळवल्यानंतर त्यांची काही मिनिटात धाव घेतली मात्र याचवेळी चोरटे पळाले, चोरटे पळाले असा गोंधळ सुरू झाल्याने घोळका आवाजाच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी पोलिस व नागरीकांच्या हातावर तुरी देत पळ काढला. दरम्यान दिनेश झोपे यांना बुधवारी रात्रीच चोरीची माहिती कळवल्यानंतर ते रूईखेडा, ता.मुक्ताईनगर येथून बुधवारी पहाटेच 2.30 वाजता घरी पोहोचल्यानंतर त्यांनी चोरी झालेल्या वस्तूंची पाहणी केली तसेच अस्ताव्यस फेकलेले साहित्य आवरले. बुधवारी दिवसभरात चोरट्यांनी दरवाजा उघडताना भिंतीचे प्लॅस्टर निखळले असल्याचेही दिसुन आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *