घटस्फोटीत हिनाच्या आयुष्यात मोईनने भरले ‘उमेदीचे रंग ‘ ; भुसावळात पार पडला आदर्श विवाह : रीजवानला मिळाले पित्रृछत्र ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर सहा वर्षीय मुलासह एकाकी जीवन जगणार्‍या हिना कौसर या महिलेच्या आयुष्यात भुसावळातील बॉक्सर मोईन नईम शेख या तरुणाने उमेदीचे रंग भरत विवाहासाठी हात पुढे केला शिवाय हिनाच्या सहा वर्षीय मुलगा रीजवानचे पालकत्वही स्वीकारले. भुसावळात सोमवारी पार पडलेल्या या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भुसावळाच्या मोहम्मदीया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षीय मुलगा रीझवानसह एकाकी जीवन जगत असतानाच याच भागातील रहिवासी व उत्कृष्ट बॉक्सर असलेला अविवाहित तरुण मोईन शेख यास कुटुंबियांना विवाहाबाबत विचारणा केली असता त्याने वयाने सहा वर्षाने मोठ्या असलेल्या हिनासोबत लग्न करण्यास होकार दिला शिवाय हिनाच्या सहा वर्षीय मुलगा रीजवानचे पालकत्वही आनंदाने स्वीकारले. तत्पूर्वी मोईनचे वडील नईम शेख, त्यांचे काका शेख पापा कालू व रफिक कालू यांनी हिनाच्या आई व काका यांच्याशी यशस्वी बोलणी केली. सोमवारी मोजक्याचे पाहुण्यांच्या उपस्थितीत मोहम्मदीया नगरात सोशल डिस्टन्सचे पालन करून विवाह पार पडला.
या विवाहासाठी हिनातर्फे वकील म्हणून शौकत मजीद शेख यांनी तसेच साक्षीदार म्हणून इम्तियाज शेख व युसुफ बागवान यांनी भूमिका अदा केली.
या विवाह सोहळ्याला हिनातर्फे तिचे भाऊ पोलिस कॉन्स्टेबल इम्रान शेख, वकार शेख ,शेख हसन, चिनावलचे माजी सरपंच कलीम डेप्युटी, नगरसेवक प्रतिनिधी साजीद शेख, तस्लीम पठाण, अजीम हाजी, सैय्यद पोस्ट मास्टर, वारीस खान, वाहिद खान, ईल्यास शाह, गुफारान शेख आदींची उपस्थिती होती.
भुसावळात पार पडलेला हा याा शतकामधील एक अनोखा विवाह म्हणून नोंदविला गेला असल्याचे मत जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी प्रत्यक्ष नवविवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद देताना व्यक्त केले. अंतिम प्रेषितांचे जीवन चरीत्र आपण अंगीारले तर खरे आपण इस्लाम धर्माचे पाईक ठरू, असेही त्यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *