भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळच्या नागरिकांनी शहरात होत असलेल्या नित्कृष्ट दर्जाचे रस्त्यांच्या कामा बद्दल व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कृऊबा समिती सभापती सचिन चौधरीं यांच्याकडे बुधवार दिनांक ४ नोव्हेबर रोजी तक्रारी करीत तिव्र रोष व्यक्त केला , या अनुषंगाने नागरिकांच्या समस्यांची दखल सचिन चौधरीं यांनी घेतली व त्वरीत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच इंजिनियर तोषणीवाल यांची भेट घेतली.
यावेळी शहरात होत असलेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे केली . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.



