लेवा समाज विवाहोच्छुकांना नाव नोंदणीसाठी आवाहन –


भुसावळ (प्रतिनिधी )-
सकल लेवा पाटीदार समाज, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत विभाग, भुसावळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ, औरंगाबादतर्फे समाजातील विवाहेच्छूक वधू-वर सूची 2020 करीता समाजातील विवाहेच्छूकांनी शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहितीचे संकलन असलेली पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत आहे. वधू-वर सूची अर्ज लेवा पाटीदार पतसंस्था, निसर्ग प्लाझा, जामनेर रोड, भुसावळ व भोरगाव लेवा पंचायत विभाग, हॉटेल मल्हार शेजारी, भुसावळ समाज बांधवांना येथे मिळणार असल्याचे शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, पंचायत सचिव डॉ.बाळू पाटील व मधुकर सरोदे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर (9373400011, 9860791180,9404533255, 9823085233, 8007053895,9890379020, 9823214150) संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *