भुसावळात खाजगी इलेक्ट्रीशीयनचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू –


भुसावळ –

शहरातील रहिवासी व व्यवसायाने खाजगी इलेक्ट्रीशीयन असलेल्या 50 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना रेल्वे ब्रिजपासून सुमारे 150 फूट अंतरावर घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजीव मुरलीधर पाटील (50, बियाणी मिल्टी स्कूलसमोरील वसाहत, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. संजय पाटील हे इलेक्ट्रीक फिटींगची कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुठल्यातरी धावत्या रेल्वेचा त्यांना धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. रेल्वेचे ऑनड्युटी डीवायएसएस यांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक विनोद गोसावी व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. मयताच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *