जामनेर (प्रतिनिधी)-
जामनेर तालुक्यातील शहापूर येथील भारतीय चलनी बनावट नोटासह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने जामनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ताब्यात घेण्यात आले .
आज दिनांक ३१ रोजी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने , पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पंडित दामोदरे पाटील पोलीस कॉन्स्टेबल सचिन प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल भगवान तुकाराम पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी शनिवार ३१ रोजी सकाळी नऊ वाजता बापू रोहम पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक विजय पाटील यांना गुप्त बातमी द्वारे माहिती दीली की शहापूर तालुका जामनेर येथे संशयीत आरोपी शेख फारुख शेख नवाब वय ४६ राहणार शहापूर तालुका जामनेर हा बनावट भारतीय चलनी नोटा खऱ्या म्हणून दैनंदिन व्यवहारात वापरत आहे व आता त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या बनावट भारतीय चलनी नोटा आहेत अशी माहिती मिळाली.
यावरुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्याप्रमाणे वरील पोलीस स्टॉप असे शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह जामनेर येथे आले तसेच पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने शासकीय विश्रामगृह जामनेर येथे बोलावून वरील हकीकत कळविली त्यांनी शीतल साहेबराव पाटील वय ३२ जामनेर यांना पंटर म्हणून पाठविण्यात आले . त्यांच्या कडे ५०० रु चार भारतीय चलनी नोटा दिल्या पंटर मोटरसायकल वर व पोलिस पंच असे खाजगी वाहनाने शहापूर गावाच्या बाहेर जामनेर शहापूर रोड आले . शहापूर येथे रोडवर एका निंबाच्या झाडाखाली पंटर थांबला त्याच्या शंभर मीटर अंतरावर पोलीस गाडीत बसले होते. दरम्यान १ वाजून १० मिनिटांनी पंटर जवळ एक इसम लाल रंगाच्या मोटरसायकल वर आला व थांबला त्याच्या काहीतरी बोलणे चालू असताना त्यांनी त्यांना पैसे देतांना दिसले पण ठरल्याप्रमाणे काम झाल्यावर पंटरने डोक्यावरून हात फिरवला पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्या इसमास पकडले . आरोपी शेख फारुख शेख नवाब वय ४६ रा शहापूर तालुका जामनेर असे आरोपीने नाव सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याच्या जवळ बनावट नोटा व पंटरकडे दिलेल्या पाचशे रुपये दराचे चार नोटा मिळून आल्या असा एकूण २६ ,५०० रुपये व एकूण ५३ भारतीय चलनी नोटा वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल आरोपी शेख फारुख नवाब यांच्या जवळील बनावट भारतीय चलनी नोटा या बँक कडून तपासणी करणे कामी ताब्यात घेण्यात आल्या व आरोपी याची मोटरसायकल जप्त करण्यात आली पाचशे रुपये भारतीय चलनी नोटांचे तपासणी शाखा प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया जामनेर यांचेकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यात आले असून आरोपी शेख फारुख शेख नवाब याच्या विरोधात जामनेर पोलिसात भादवि कलम ४८९(ब)/(क) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीस पुढील तपास कामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . या बनावट नोटा मुळे एकच खलबल उडाली असून बनावट नोटा प्रकरणी कसून चौकशी करून यात मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविन्यात येत आहे .



