आसनसोल सहाय्यक सुरक्षा आयुक्तपदी विनोदकुमार लांजीवार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नाशिक आरपीएफ ट्रेनिंग सेंटरमधील निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांची आसनसोल (पूर्व रेल्वे, पश्‍चिम बंगाल) सहाय्यक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. याबाबतचे आदेश आरपीएफ रेल्वे बोर्डाचे डायरेक्टर ए.के.अग्निहोत्री यांनी काढले आहेत. २८ वर्ष रेल्वे सुरक्षा बलात सेवा लांजीवार यांनी केली असून भुसावळसह जळगाव, अकोला, बैतुल आदी ठिकाणी निरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. भुसावळ येथे सेवा काळात त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याने भुसावळकरांना त्यांचे कार्य आजही लक्षात आहे. पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्यावर सहकारी व अधिकार्‍यांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *