भुसावळात तिघांवर प्राणघातक हल्ला ;परस्परां विरुद्ध गुन्हे दाखल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात पुन्हा भाईगिरीच्या वादातून एका घटनेत एकाला इमारतीवरून फेकण्यात आल्यानंतर त्याच्या साथीदारालाही फेकण्याचा प्रयत्न झाला तर या घटनेतील संशयीत आरोपीतानेही परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीत व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणातून संशयीतांनी पोटावर चाकू हल्ला केल्याची घटना सोमवार २६ रोजी रात्री नऊ वाजता हॉटेल तनारीका मागे घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमींना रीदम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाईगिरीतून एकाला इमारतीखाली फेकले
पहिल्या गटातर्फे अजय गिरधारी गोडाले (27, लाल जैन, मंदिरामागे, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी बंटी उर्फ प्रवीण विसपुते (पंधरा बंगला, भुसावळ) व अन्य दोन साथीदार (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुरनं.916/2020, भादंवि 307, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी प्रवीण विसपुते याने फिर्यादी अजय गोडाले व त्याचा मित्र अजय (पूर्ण नाव नाही) यांना तनारीक हॉटेलमागील त्याच्या घराच्या नवीन बांधकाम होत असलेल्या गच्चीवर बियर पाजण्यासाठी सोमवारी रात्री नेले व कुरापत काढत तु भाई बन रहा है क्या, असे सांगत वाद वाढवला मात्र फिर्यादीने बहकी बहकी बाते मत कर असे सांगितल्याने आरोपीने त्यास गच्चीवरून खाली फेकले व त्याच्या डोक्यावर दगड टाकण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी फिर्यादीचा मित्र अजयने दगड दुसरीकडे फेकला व याचा राग आल्याने आरोपीने अजयलादेखील गच्चीवरून फेकण्याचा प्रयत्न केला व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी त्यास मदत केली . या घटनेप्रकरणी दुसर्‍या गटातर्फे प्रवीण अजय विसपुते (35, पंधरा बंगला, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी अजय गिरधारी गोडाले, अजय व अन्य अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुरनं.917/2020, भादंवि 324, 314, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीचा आशय असा की, सोमवारी रात्री नऊ वाजता फिर्यादी प्रवीणचा मित्र नरेंद्र मन्ने याचा अजय गोडालेसोबत व्याजाचा व्यवहार असून त्यास पैसे न मिळाल्याने तो मारहाण करू लागला व त्यास त्याच्यापासून सोडवत पळवून लावल्याचा राग आल्याने आरोपी अजय गोडाले याने उसके बदले अब तु पैसे दे, असे बोलल्यानंतर त्यांच्या झोंबाझोंबी झाली व अजय गोडालेसह अजय नामक आरोपीने आपल्याजवळील चाकूने पोटावर व खांद्यावर व बगलेजवळ वार करून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
सोमवारी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. जखमी रुग्णालयात दाखल असल्याने त्यांनी उशिरा जवाब दिल्याने मंगळवारी रात्री 11.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *