भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोरोना महामारीमुळे सार्वजनिक मिरवणूक , रँली , जुलूस काढण्यास बंदी आहे त्यामुळे प्रत्येकाने आप आपल्या घरात सण उत्सव साजरा करावा प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे .कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांनी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात ईद ए मिलाद निमित्त आयोजित केलेल्या मुस्लीम बांधवांच्या बैठकीत म्हटले आहे .
सर्व मुस्लिम बांधवांनी आप आपल्या घरात ईद ए मिलात उत्साहात साजरी करावी .कोणी हि सार्वजनिक जुलुस , रँली मिरवणूक काढू नये . नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही . असे कुमार चिंथा यांनी म्हटले आहे . जळगाव शहरात नवरात्र उत्सवात गरबा दांडीया खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत . भुसावळ मध्ये सुद्धा गणपती व नवरात्र उत्सवात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे चिंथा यांनी यावेळी सांगितले आहे .
प्रसंगी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष शेख सलीमशेठ चुडीवाले यांनी कोणी हि रँली काढणार नसल्याची ग्वाही देत प्रत्येकाने घरातच नमाज अदा करावी असे आवाहन समाजबांधवाना केले तसेच कोरोना पासून सर्वांना मुक्ती मिळण्यासाठी अल्ला कडे प्रार्थना करावी असेही ते म्हणाले .
याबैठकित बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , माजी नगरसेवक शेख साबीर , शेख पापा शेख कालु , मौलाना गुलाम सरवर , मौलाना अब्दुल हलीम , अल्लाहबक्ष शहा आदी समाज बांधवासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते .



