भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय जनता पार्टी तर्फे भुसावळ विधानसभा मतदार संघाची महत्वपूर्ण विस्तृत बैठकीचे आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर गुरुवार रोजी
सायंकाळी ६ वाजता लोणारी समाज मंगल कार्यालय,जळगाव रोड,भुसावळ येथे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीला प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक
विभागीय संघटनमंत्री रविन्द्र अनासपुरे , आ.गिरीश महाजन,आ राजू मामा भोळे (जिल्हाध्यक्ष भाजपा)
प्रदेश चिटणीस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,
आमदार संजय सावकारे,
उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर ,
सरचिटणीस विजय धांडे,
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे,
माजी नगराध्यक्ष सुनील काळे,
यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
सदर बैठकी साठी भुसावळ मतदार संघातील लोक प्रतिनिधी,भाजपा पदाधिकारी,भाजपा कार्यकर्ते,युवा मोर्चा पदाधिकारी,जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,विविध आघाड्याचे अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा शहर सरचिटणीस पवन बुंदेल आणि अमोल महाजन तसेच भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील,सरचिटणीस दिलीप कोळी यांच्या तर्फे करण्यात आले



