भुसावळ (प्रतिनिधी )-
मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय प्रांगण मध्ये , सतर्कता जागरूकता सप्ताह निमित्त मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी मंडळ रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता,यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी, यांना सत्यनिष्ठाची शपथ दिली .
या कार्यक्रमाध्ये मंडळ रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, आणि अप्पर मंडल रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा ,सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे द्वारा करण्यात आले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ दूरसंचार विभाग, इंजीनियरींग विभाग आणि कल्याण विभाग सहकार्य केले . सतर्कता जागरूकता सप्ताह मध्ये दिनांक 14 रोजी निबंध प्रतियोगिता आणि स्लोगन (घोषवाक्य) , दिनांक 15 चित्रकला आणि वाक स्पर्धा घेण्यात आल्या . याव्यतिरिक्त कर्मचार्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी फील्ड स्तरावर नासिकोड येथे दिनांक 28/10 आणि मनमाड येथे 29/10 रोजी कर्मचारी तक्रार निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .



