भुसावळ (प्रतिनिधी )-
यावल रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी येथील प्रशांत भोळे वय ३९ या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. पुलावरून उडी घेताच नदीपात्रातील खडकावर आपटल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सहकार्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



