भुसावळ : पुणे-मिरज विभागातील भिलवडी आणि नांद्रे स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वेने दोन गाड्या रद्द दोन दोन गाड्यांचा मार्ग वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या झाल्या रद्द
01039 डाऊन कोल्हापूर गोंदिया विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 17 ते 19 ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे तर अ गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 17 व 18 रोजी रद्द करण्यात आली आहे
य्ग
गाड्यांच्या मार्गात बदल
डाऊन 02779 वास्को डी गामा-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून 17 ते 19 ऑक्टोबरदरम्यान मिरज-कुर्डूवाडी-दौंडमार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनला जाईल तर अप 02780 हजरत निजामुद्दीन ते वास्को डी गामा ही गाडी 17 ते 18 दरम्यान दौंड, कुर्डूवाडी, मिरज मार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनला जाईल. रेल्वे प्रवाशांनी गैरसोय टळण्यासाठी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


