वरणगावात सराफा दुकानात धाडसी चोरी : एक लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास –


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील वरणगाव गावात राजमल ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी एक लाख ६२ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या घटनेने सराफा व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील बोदवड रोडवरील राजमल ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर व चॅनल गेटचे कुलूप तोडून दुकानाच्या शोकेसमधील चांदीच्या पायल, चांदीच्या चैन, चांदीचे पोत पदक, चांदीचा हार, चांदीचे निरंजन, चांदीची वाटी व चमचा, फुलपात्र, ग्लास व अत्तरदाणी आदी मिळून एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात संजय जवाहरलाल जैन यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरट्याने दुकानात लावलेला सीसीटीव्ही लांबवला असल्याचे सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे म्हणाले. परीसरातील सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *