वरणगाव (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचा माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले असून
92 रुग्णांनी या शिबिराचा लाभ
घेतला .
गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण अनेकजण अडचणींना सामोरे जात आहोत कोणताही आजार होण्यासाठी अस्वच्छता कारणीभूत असते आपण सर्वांनी स्वच्छतेवर भर दिल्यास वेगवेगळ्या आजारांवरती निश्चितपणे आपण मात करू शकतो कोरोनाच्या काळामध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास आपण कोरोना आजाराला हद्दपार करू शकतो येणाऱ्या काळात रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात आरोग्य शिबिर आयोजन करण्यावर भर असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे यांनी केले
वरणगाव येथील गणपती हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने लहान मुले, महिला यांचे मोफत रोग निदान शिबिर व व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे फौजदार सुनील वाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भाटकर गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान डॉ पी व्ही पाटील डॉ. हर्षला पाटील डॉ वंदना वाघचौरे डॉ रवींद्र माळी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे माजी अध्यक्ष सुनील शीरनामे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर प्रोजेक्ट चेअरमन किशोर पाचपांडे सुनील वानखेडे जीवन महाजन बापू चौधरी राजेंद्र परसे आई सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शीलांबरी जमदाळे आनंद महिला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिभा तावडे पंडित नेहरू विद्या मंदिर तळवेल चे पर्यवेक्षक एस एस अहिरे यांची उपस्थिती होती
यावेळी फॉर्टस औषध कंपनीचे सेल्स ऑफिसर शशांक शीरनामे यांच्याकडून विविध आजारावरील गोळ्या रुग्णांना देण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले तसेच कोरोणाच्या या काळामध्ये सोशल डिस्टन्स वरती यावेळी भर देण्यात आला मास्क घातलेल्या रुग्णाला आत प्रवेश देण्यात आला
आरोग्यविषयक नियमांचे पालन करा
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना चा असलेला प्रभाव कमी होत आहे यासाठी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत आहे या नियमांचे शंभर टक्के पालन झाल्यास आपण कोरोणाला हद्दपार करू व भयमुक्त जीवन जगू शकतो
संदीपकुमार बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक
आरोग्य शिबीर उपयुक्त
कोरोनाविषाणू च्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोग्य शिबिर हे उपयुक्त असून यापुढे आपण खेड्यांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करण्यावर भर द्यावा व या या आरोग्य शिबिरातून कोरोना विषाणू बाबत जनजागृती करून ही महामारी संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत विलास भाटकर
गटविकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ
या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार
रोटरीने क्लब ऑफ व्हॅली भुसावळ यांच्या माध्यमातून वरणगाव शहरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर हा उपयुक्त कार्यक्रम असून या कार्यक्रमाला भविष्यात आपण मोठे स्वरूप देऊन शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्ही देखील मदत करू
सुनील काळे
माजी नगराध्यक्ष
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभार जीवन महाजन यांनी मानले



