पाचोरा (प्रतिनिधी) –
पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांनी कोरोनाची भीती न बाळगता केलेल्या कार्याचे कौतुक सातगाव ग्रामस्थांनी केल असून ” ” कोरोना योद्धा ” म्हणून त्यांचा नुकताच सत्कार केला .
सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे या महिला अधिकारी म्हणून गेल्या पाच महिन्यापासून पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. कर्तव्यनिष्ठ, सक्षम व धाडसी , महिला अधिकारी असून देखील त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय आहे . अवैधधंदे व धंदेवाइक यांचेविरोधात जोरदार मोहीम आखल्यामुळे अनेकांचे ढाबे दणाणले आहे. यावेळी नवदुर्गा उत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. प्रसंगी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आनंदात दुर्गोस्तव साजरा करावा असे आवाहन कायटे यांनी केले.
. अवैद्य धंदे, स्त्रियांवर होणारे अत्याचार, गरिबांवर अन्याय याबाबत समस्या असल्यास कळवाव्या असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
बैठकीस उपसभापती अनिता पवार, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद वाघ, पोलिस पाटील, दत्तू पाटील, डी. आर. वाघ, भागवत पवार, ज्ञानेश्वर अहिरे, शंकर पवार, सुनील मराठे, तलाठी रूपाली रायगडे, सुनील डांबरे, बहादुर पाटील, दिलीप पाटील, दिपक परदेशी, सागर चौधरी तसेच सर्व दुर्गा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.



