भुसावळ (प्रतिनिधी )-
आठवडे बाजारात कामानिमित्त आलेल्या वयोवृद्धाची दुचाकी सापडत नसल्याने त्यांना दुचाकी चोरी झाल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत निरीक्षक दिलीप भागवत यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर लागलीच वयोवृद्धासोबत पोलिस कर्मचार्यांना डेली बाजारात पाठवण्यात आले व पोलिसांनी सर्वदूर पाहणी केल्यानंतर त्यांना एका जागी दुचाकी आढळल्याने ती वयोवृद्धाच्या ताब्यात देण्यात आली. बाजारपेठ पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांची सतर्कता आली कामी
शहरातील राजेश्वर नगरातील रहिवासी विनाश वासुदेव पुराणिक हे ११ रोजी दुपारी अडीच वाजता डेली मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांनी दुचाकी (एम.एच.१९ बी.एच.६३८४) कुठेतरी लावली व त्यांना त्याबाबत विसर पडला व बाजारातील काम आटोपल्यानंतर त्यांनी दुचाकीचा शोध घेतला मात्र ती न आढळल्याने ती चोरी झाल्याचा संशय त्यांना आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिस कर्मचारी कृष्णा देशमुख व ईश्वर भालेराव यांनी लागलीच डेलि बाजारात धाव घेत गाडीचा शोध घेतल्यानंतर दोन तासानंतर दुचाकी सापडल्याने ती वयोवृद्धांच्या ताब्यात देण्यात आली.



