जबरी चोरीतील पसार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
चाकूच्या धाकावर लूट केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील पसार आरोपीस ११ महिन्यानंतर पकडण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. लुकमान उर्फ लुक्का कादर शहा (26, रा.दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला किशोर महाजन, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *