भुसावळ (प्रतिनिधी )-
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यानंतर याच धर्तीवर जळगांव जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे सूत्र पक्के करण्यासंदर्भात हालचाली शिवसेनेत गतिमान झाल्या असून याच पार्श्वभूमीवर नुकतेच जळगांव विभागात संपर्क प्रमुखांचा दौरा संपन्न झाला .या अनुषंगाने या आठवड्यात उद्या दिनांक १० व ११ पासून शनिवार -रविवार लोकसभा विभागाचे संपर्क प्रमुख विलास पारकर (मुंबई) यांचा महत्वपुर्ण दौरा होणार असून या दौऱ्यात संपर्क प्रमुख विलास पारकर (मुंबई) , जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील ( मुक्ताईनगर) , तालुका संपर्क प्रमुख मोहन मसुकर (मुंबई ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा संघटनात्मक आढावा घेण्यात येणार आहे .
मातोश्री दरबारी जंक्शन स्थित पदाधिकारी व शिवसैनिकांच्या तक्रारी गेल्याने त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच मरगळ आलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा नवे शिवसेनेच्या कार्याचे टॉनिक देण्यासाठी गाव तेथे आणि घर तेथे पक्ष संघटनेचे मजबुतीकरण करण्यासाठी हा महत्वाचा दौरा पार पडणार असून या दौऱ्याचे इतिवृत्त थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाणून घेणार आहेत असे पदाधिकाऱ्याने सांगितले . यामुुळे सदर
दौऱ्या कडे तमाम पदाधिकारी व शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आहे . असा असेल दौरा :
दि.१० ऑक्टोबर २०२०
जामनेर विधानसभा क्षेत्र – सायं.४.वाजता
रावेर-यावल विधानसभा क्षेत्र – सायं.७. वाजता.
दि.११ ऑक्टोबर २०२०
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र – सकाळी १.वाजता.
भुसावळ विधानसभा क्षेत्र -दुपारी १ वाजता.
चोपडा विधानसभा क्षेत्र – दुपारी ३ वाजता या प्रमाणे असे शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी कळविले आहे .



