कोल्हापुर -दौंड- मनमाड किसान पार्सल विशेष ट्रेन सांगोला येथून धावणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोल्हापुर दौंड- मनमाड लिंक किसान पार्सल विशेष ट्रेन मधे परिवर्तन सांगोला हुन प्रस्थान आणि गाड़ी आता आठवड्यातून 2 दिवस शुक्रवार आणि मंगळवार रोजी धावणार आहे
. शेतकरी लोकांचया मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी दिनांक 25 ऑगष्ट पासून दर शुक्रवार आणि मंगलवार ला “किसान रेल” पार्सल गाड़ी ही चालवली जाणार आहे . त्यामुळे शेतकरी , व्यापारी , बाजार समिती , लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त प्रमाणात माल पाठविता येईल . आणि या गाडीच्या प्रस्थान स्टेशन मधे बदल करण्यात आला आहे ही गाड़ी आता सांगोला या स्टेशन वरून प्रस्थान करेल .
गाड़ी क्रमांक 00109 डाऊन कोल्हापुर -मनमाड लिंक विशेष किसान पार्सल गाड़ी सांगोला हुन प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार ला सकाळी 08 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 6.30 वाजता मनमाडला पोहोचेल.
गाड़ी क्रमांक 00110 अप मनमाड-दौंड लिंक विशेष किसान पार्सल गाड़ी मनमाडहून प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार ला 20. वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दौंड ला 00.20 वाजता पोहोचेल.पंढरपुर,कुर्डवाडी,दौंड ,
बेलवडी ,अहमदनगर,बेलापुर ,कोपरगाँव आणि मनमाड नंतर देवळाली मुजफ्फरपुर- किसान पार्सल गाडी चे थांबे असतील
सरंचना –सांगोला येथून 10 व्हीपीयू आणि एक लगेज कम गार्ड ब्रेक, आणि दौंड येथून 2 व्हीपीयू , ही सर्व व्हीपीयू गाड़ी क्रमांक 00107/00108 देवळाली ते मुजफ्फरपुर- देवळाली किसान पार्सल गाड़ीला मनमाड येथे जोडली जाईल व काढली जाईल.
ज्या शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स , याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल . रेल प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त पणे या गाडीचा उपयोग घ्यावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *