भुसावळ (प्रतिनिधी ) –
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना.बच्चु कडू यांच्या आदेशानुसार तसेच संपर्क प्रमुख दत्तू बोडके व जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा सचिव रजत शिंदे व युवा संघटक जोहेब सैय्यद यांनी प्रहार जनशक्ती पक्ष कसा वाढवावा,गोरगरीब जनता,अपंग तथा शेतकरी वर्गाचे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत आढावा बैठक घेतली.
या बैठकिनंतर युवा कार्यकारणीची निवड करण्यात आली.यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपर्क प्रमुख पदी मातंग समाजाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास वलकर यांची नियुक्ती करण्यात आली. पदाधिका-यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.



