श्री गणेश स्थापनेपूर्वी रस्ते दुरुस्ती न केल्यास नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा-जगन सोनवणे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील व तालुक्यातील खड्डेमय रस्ते येत्या २४ तासात त्वरीत दुरुस्त करावे तातडीने श्री गणेश स्थापनेपूर्वी त्वरीत दुरुस्त करावे तसेच भुसावळ शहर व कंडारी गावातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवून शुद्ध पाणी पुरवठा करावा आणि हे करणे जमत नसल्यास नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जगन सोनवणे यांनी केली असून याबाबत तहसीलदार यांना शुक्रवार दिनांक २१ रोजी निवेदन देण्यात आले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच नागरिक त्रस्त आहेत शासनाचे नियम अटींचे पालन करूनच श्री गणेशाचे आगमन होत आहे.
अश्या परिस्थितीत शहरातील रस्त्ये व त्यांची झालेली दुरावस्था बघता भुसावळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रमण भोळे निष्क्रिय असल्याचे सिद्ध होत आहे . शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.याला जबाबदार नगराध्यक्ष रमण भोळे असून यांनी २४ तासांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तसेच शहरात शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जगन सोनवणे यांनी केली आहे.याच बरोबर कंडारी गावातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी तहसीलदार यांच्या दालनात नायब तहसीलदार निकम यांना १० संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.तसेच सन २०१६ ते २०२० पर्यत जो केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ शहर सर्वेक्षण केलेले आहे ते सर्व चुकीचे आहे.मॅनेज केलेल्या सर्वेक्षणात आणि प्रत्यक्ष शहराची जी दुर्दशा झालेली आहे.त्या खूप मोठी चूक केंद्र सरकारने केलेली आहे.ती भुसावळकरांना मान्य नाही.रस्ते दुर्दशा प्रकरणी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी तातडीने नैतिक दृष्ट्या राजीनामा द्यावा.
यावेळी जगन सोनवणे,हरिष सुरवाडे,नगरसेविका सौ.पुष्पाताई जगन सोनवणे,राकेश बग्गन, संतोष मेश्राम,बबलू सिद्धीकी,गणेश शिंपी,गोपी साळी, अब्दुल अजीज आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *