छायाचित्रकारांचे विस्कटलेले जीवनमान सावरण्यासाठी असोसिएशन प्रयत्नशील -आनंद ठाकरे ; भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन तर्फे छायाचित्रकार दिन साजरा


भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ असोसिएशनतर्फे छायाचित्रकार दिन साध्या पद्धतीने कॅमेरा पूजन करून साजरा करताना छायाचित्रकारांची विस्कटलेली घडी पुनश्च बसण्यासाठी भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे यांनी केले.
प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष बबलू ब-हाटे कोषाध्यक्ष अजय शिंपी सचिव राहुल पाटील सहसचिव राजेंद्र भंगाळे सल्लागार निलेश कोल्हटकर कमिटी सदस्य विनोद गोऱधे, अविनाश तळश सह माजी अध्यक्ष योगेश उबाळे ,प्रकाश चौधरी ,राहुल वानखेडे, मयूर जगताप,नितीन मोरे ,बंडू हेडा, आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती
. कॅमेरा पूजन कार्यक्रम कोरोणा ची स्थिती लक्षात घेता काळजीपूर्वक छोटेखानी कॅमेरा पूजन कार्यक्रम असोसिएशन’चे अध्यक्ष आनंद ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर झालेल्या चर्चेअंती कोरोना अभावी छायाचित्रण व्यवसाय ठप्प झालेला असून छायाचित्रकार बांधवांवर सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी संपूर्ण व्यवसायिक बांधवांसाठी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात चर्चा विनिमय संपन्न झाली महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या कोविड लोन योजने अंतर्गत छायाचित्रकारांचे पुनर्वसन करता येऊ शकते यासंदर्भात असोसिएशन लवकरच प्रशासन दरबारी आपल्या व्यथा मांडणार असून छायाचित्रकारांचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे संपूर्ण असोसिएशन कमिटीने निर्णय घेतलेला आहे त्यासंदर्भात शासनाच्या नियमात अधीन राहून छायाचित्रकार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी असोसिएशन कटिबद्ध असून विविध उपाय योजना आखून छायाचित्रकारिता व्यवसायाला पुढचे चांगले दिवस येतील असा विश्वास संपूर्ण छायाचि कमिटीने व्यक्त केला आहे याबाबत लवकरच चिंतन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे असोशियन तर्फे कळविण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *