यंदा गणेशोत्सव आनंदाने, नव्या पद्धतीने, साजरा करा- प्रा. डॉ. दयाघन एस राणे,


भुसावळ (प्रतिनिधी )-
अवघ्या चार दिवसांत गणेशोत्सव येतोय, या वर्षी गणेशोत्सवाचं स्वरूप लॉक डाऊन मुळे खूप छोट आणि त्रोटक असलं तरी घरगुती गणेश स्थापना असतीलच, दर वर्षीचा जल्लोष नसेल, नाही तरी टिळकांना जो गणेशोत्सव अभिप्रेत होता तो असा नव्हताच. लॉक डाऊनच्या निमित्ताने आपण टिळकांना काय अभिप्रेत होत त्याचा विचार आणि कृती करण्याचा प्रयत्न करू या. या वर्षा पुरतं किमान घरात राहून कोरोनाच संक्रमण टाळता आल तरी ते मोठ सामाजिक कार्य ठरेल असेही राणे म्हणाले .
तसेच या वर्षी घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर दोन गोष्टी मात्र आवर्जून कराच असे आग्रहाने सांगितले .
जसे रोज उत्साहाने आरती करालच पण निर्माल्य एका मडक्यात जमा करा. रोज निर्माल्य टाकल्या नंतर त्यावर मुठ भर गायीच्या शेणाचे शेणखत टाका. हे करीत असताना दोन दिवसा आड थोड पाणी त्यावर शिंपडा किवा देव धुण्याच पाणी या मडक्यात टाकत जा. अक्षय तृतीयेच्या दिवशी च्या दिवशी भरलेल्या घागर असेल च आपल्या घरी, त्या घागरीला खाली आणि आजूबाजूला बारीक छिद्र पाडून, त्या मध्ये हा प्रयोग करा, दिवाळी पर्यंत अत्यंत सुंदर कंपोष्ट खत तयार झालेलं असेल.
हे खत नेहेमी सारखं नसेल, त्यात असतील तुमच्या मनातील भक्ती, आस्था, अस्तिकाता आणि समर्पणा च्या पवित्र लहरी….
हे खत तुमच्या दारी असणाऱ्या फुलझाडे किंवा तुळसी च्या झाडाला टाका, तुमच्या खतामधल्या पवित्र लहरी पुन्हा, या झाडांच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या परिसरात पसरतील आणि सगळा परिसर प्रसन्न होऊन जाईल.तसेच आपण उत्साहाने साजरा करीत असलेल्या गणेशोत्सवातील श्री गणेश मूर्ती शाडू च्या माती ची च घ्या, उत्सव संपला म्हणजे बादली किंवा टब मध्ये विसर्जित करा, विसर्जन नंतर बादली मधलं पाणी आपल्या परसातील झाडांना द्या, माती कोरडी झाली की एखाद्या पिशवी मध्ये सांभाळून ठेवा, पुढच्या वर्षीची बाप्पाची मूर्ती या माती पासूनच बनवून या. असे आवाहन यावेळी प्रा. डॉ. दयाघन एस राणे, भुसावळ
(9403574092 ) यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *