भुसावळ (प्रतिनिधी )-
दे.ना.भोळे महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कोविडं १९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे महाराष्ट्र शासन व युजीसीच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष २०२०- २०२१ साठी वरीष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वेबसाईटच्या www.ddnbc.org या लिंकवर जाऊन प्रथम, द्वितीय, तृतीय बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास महाविद्यालयातील प्रवेश समिती सदस्य प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, (विज्ञान विभाग) प्रा.ए.आर.सावळे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.भारती बेंडाळे (कला विभाग), प्रा.संगीता धर्माधिकारी (वाणिज्य विभाग) तसेच प्रा.दीपक जैस्वार यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केले आहे.
झूम व गूगल मीट च्या माध्यमातून ऑनलाईन तासिका सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ऑनलाईन तासिकांमधून अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी यांनी कळविले आहे.



