भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील सतारे शिवारात एक एकर जागेवरती उषा नॅशनल चिल्ड्रन्स गार्डन अँड रिसर्च सेंटर अंतर्गत कलाम चिल्ड्रन सायन्स अँड रिसर्च सेंटर, रामानुजन मॅथेमॅटिक्स रिसर्च सेंटर, विक्रम साराभाई टीचर्स रिसर्च सेंटर चे उद्घाटन बुधवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन होणार आहे
शहरातील उषाबाई शंकर पाटील यांनी दिलेल्या सतारे शिवारातील एका जागेवरती रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन यांच्या अंतर्गत उषा नॅशनल चिल्ड्रन गार्डन अँड सायन्स रिसर्च सेंटर मधे तीन विभागांचे उद्घाटन होणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कलाम चिल्ड्रन सायन्स अँड रिसर्च सेंटर व रामानुजन मॅथेमॅटिक्स रिसर्च सेंटर, विक्रम साराभाई टीचर्स रिसर्च अँड सायन्टिस सेंटर चे उद्घाटन करण्यात येणार आहे यासाठी नॅशनल प्लॅनेटरी रिसर्च सेंटर मुंबई चे शास्त्रज्ञ डॉ.जे जे रावल, विज्ञान प्रसार नवी दिल्लीचे शास्त्रज्ञ डॉ. बी के त्यागी, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे, एनसीईआरटी गणित विभागाचे नवी दिल्लीचे प्रो. टी पी शर्मा, एनसीईआरटी चे मुख्य सल्लागार डॉक्टर मनोज कुमार पटारिया लखनऊ चे शास्त्रज्ञ डॉक्टर सी एम नॉटीयाल, इस्रोचे एक्स सायंटिस्ट भरतभाई चनेरीया, मॅथ्स गुरु बी एन राव यांच्या उपस्थितीमध्ये या सेंटरचे उद्घाटन होणार असून यासाठी झूम ॲप फेसबुक पेज वरून त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी उषा नॅशनल चिल्ड्रन्स गार्डन अँड सायन्स रिसर्च सेंटर चे अध्यक्ष जीवन महाजन उपाध्यक्ष दिलीप जावळे सचिव सुनील वानखेडे सहसचिव संदीप पाटील खजिनदार सौरभ जावळे सदस्य मीना जावळे यांनी केले आहे



