;
भुसावळ (प्रतिनिधी )-
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व राज्य कार्याध्यक्ष विलासराव महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी नुकतीच जाहीर केली आहे.यामध्ये
पर्यावरणपूरक उपक्रम राबवून जनजागृती करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ९ ऑगस्ट २०२० रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.
यामध्ये जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून येथील अँड. अश्विनी डोलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी
केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या आपल्या कार्याची दखल घेऊन आपली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) या संस्थेच्या जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी सन 2020 ते 2022 या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल जिल्हाध्यक्ष नाना पाटील,डॉ जगदीश पाटील, पत्रकार उज्वला बागुल , ऍड. केतकी पंडित , ऍड. जयश्री देशमुख , ऍड जसवंदी भंडारी ऍड जया पाटणकर , ऍड कृष्णा सिंग , ऍड अंजु तिवारी, ऍड स्मिता पाटील यांचेसह नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यानी अभिनदंन केले आहे.



