भुसावळ (प्रतिनिधी )-
यश मिळवण्यासाठी अवगुणांपेक्षा चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्यातील या चांगल्या गोष्टींची जाणीव होणे गरजेचे असून ज्याप्रमाणे 24 कॅरेट सोने असते त्याच प्रमाणे यश मिळवण्यासाठी चोवीस चांगल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन रोटरीचे संजय अरोरा यांनी केले
रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने द्वंद जीवनाचे या शीर्षकाखाली व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी-पालकांना ऑनलाईन शिक्षणातून घरातील वातावरण तणाव मुक्त करण्यासाठी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प संजय अरोरा यांनी गुंफले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोटरी क्लब चे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे यांनी सांगितले की समाजासाठी रोटरी क्लबच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जात असतात यानुसारच नुकताच भुसावळ येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्रणाली लोकार्पण सोहळा केला असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे
तर रोटरीचे सलीम बटाडा म्हणाले की पुढच्या कोरोना च्या काळात रोटरी समाजाच्या पाठीशी उभी राहिली असून शिक्षकांना ट्रेनिंग स्किल देण्याचे नियोजन केले आहे
तिसरे पुष्प गुंफताना संजय अरोरा म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा एवढ्याच आपल्या अंगी असलेल्या विविध गुण देखील महत्त्वाचे आहेत विविध कलेत पारंगत असलेले कलाकार आपल्याला बघावयास मिळतात परंतु आपण या शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये या कलांकडे दुर्लक्ष केलेले आहे पालकांनीदेखील आपल्या मुलांमधील गुणांची ओळख केली पाहिजे त्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे यामधूनच मोठे कलाकार घडले आहेत ज्या पद्धतीने सोने 24 कॅरेट चे चांगले असते त्याच पद्धतीने आपल्या मध्ये देखील चांगल्या 24 गुणांची रुजवण झाली पाहिजे यामध्ये जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, उद्देश, लक्ष केंद्रित करणे, प्रयत्न करणे, विश्वास संपादन करणे, संवेदना, जबाबदारी, शिस्त, निश्चय, उत्साह, करुणा यासह विविध गुण आपल्या मध्ये जर असतील तर नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप सोनवणे यांनी तर आभार योगेश इंगळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे सेक्रेटरी राम पंजाबी प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जीवन महाजन यांनी परिश्रम घेतले



