विद्युत मंडळाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय—संतोष सोनवणे रात्रीच्यावेळी सिंगल फेज सुरू ठेवण्याची मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शेतात विद्युत पुरवठा नसल्या मुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो या अडचणीच्या समस्यांपासून शेतकऱ्यांना सामना करण्यासाठी विद्युत मंडळाने तालुक्यातील इतर भागांप्रमाणे वेगळा शिवारातील शेतकऱ्यांना सुद्धा रात्रीच्या लोडशेडिंग च्या वेळी सिंगल फेज सुरू ठेवून सहकार्य करावे अशी मागणी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांनी केली आहे .
सविस्तर वृत्त असे की वेल्हाळे परिसरात व तालुक्यातील इतर भागांमध्ये दिवसाच्या दिवस व रात्री तीन दिवस असे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याचे विद्युत मंडळामार्फत लोडशेडींग ठरवण्यात आले आहे असे असताना रात्रीचे लोडशेडिंग यावेळी विद्युत मंडळाचे कर्मचारी आपल्या मुख्यालयी न राहता स्वतःच्या गावी राहतात अशातच रात्रीच्यावेळी डी ओ पडणे, रोहित्र जवळील पेटीतील फेज उडणे असे अनेक तांत्रिक बिघाड रात्रीच्या वेळी होत असतात परंतु ते दुरुस्त करण्यासाठी मुख्यालय वायरमन उपस्थित नसतो त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंड आलेला पिकाचा घास नाहीसा होतो तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वायरमन लोकांनी मुख्यालय राहतील अशा शेतकरीवर्ग मार्फत अपेक्षा व्यक्त होत आहे तसेच शेती शिवारातील बसवलेल्या प्रत्येक रोहित्र जवळील पेटीतील कट आउट व चिनी मातीची उपकरणे पूर्णपणे नाहीशी झालेली आहे वायरमन उपस्थित नसल्यास शेतकरी व वायरमन असे हे दोघेही लोक विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचा धोका पत्करून या उपकरणांवर कामे करतात उदाहरणार्थ फेज डी ओ टाकणे यातच तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे विद्युत मंडळाकडे साधे फेज साठी लागणारे तार सुद्धा वायरमन लोकांकडे उपलब्ध नसतात विचारणा केली असता वरून आम्हाला मिळत नाही आम्ही आमच्या सोयीनुसार करतो असे उत्तरे मिळतात तसेच वेल्हाळे परिसरातील शेती शिवार हे फॉरेस्ट एरियाला लागून असल्यामुळे या शिवारात मोठ्या प्रमाणावर नीलगाई, रान डुक्कर तसेच हरीण बिबट्या सह अनेक प्राण्यांचे वास्तव्य असून या प्राण्यांपासून आपल्या पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी वर्ग रात्रीच्यावेळी आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठ रोज रात्री आपल्या शेतात जातात व अंधारामध्ये या जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करतात मात्र या वेळी शेतात विद्युत पुरवठा नसल्या मुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो या अडचणीच्या समस्यांपासून शेतकऱ्यांना सामना करण्यासाठी विद्युत मंडळाने तालुक्यातील इतर भागांप्रमाणे वेगळा शिवारातील शेतकऱ्यांना सुद्धा रात्रीच्या लोडशेडिंग च्या वेळी सिंगल फेज सुरू ठेवून सहकार्य करण्याची मागणी होत आहे याबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील तसेच ऊर्जामंत्री नामदार राऊत यांना निवेदने देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांना मार्फत मांडल्या जाणार आहेत तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या विषयाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी संतोष सोनवणे,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख,भुसावळ यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *