भुसावळ (प्रतिनिधी )-
दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात शेतकरी बांधवांनी जीव धोक्यात घालुन जीवनावश्यक दुध उत्पादनाचे काम सुरु ठेवले अाहे,मात्र सद्यस्थितीत दुधाचे भाव राज्य सरकारने अतिशय कमी केले आहेत,उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही आणि अशातच महाराष्ट्र शासनाने दुध उत्पादकांना मिळणारे अनुदान ही बंद केले आहे म्हणून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते.परंतू राज्यातील सत्ताधारी आघाडी शासनाला दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी
दि.१ आॅगस्ट शनिवार रोजी सकाळी ११ वाजता नाहटा कॉलेज चौफुली येथे भाजपा महायुती मित्रपक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात
रास्ता रोको करणे,दुध टँकर अडवून ठेवण्यात येणार असून यात आ.संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे
व महायुतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, शाखाध्यक्ष, नगरसेवक,आघाडी,मोर्चा पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमूख ,कार्यकर्ते बंधू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
भुसावळ येथील या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व मास्क बांधून सामील होण्याचे आवाहन शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेल व
अमोल महाजन यांनी केले आहे.



