रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे करोना कर्मयोगी यांचा सन्मान


भुसावळ (प्रतिनिधी )-
करोना च्या कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा स्वतःच्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेंटर रेल्वे हॉस्पिटल भुसावळच्या परिचारिका सिस्टर तिरके, सिस्टर रामवती , सिस्टर करुणा आणि आयसोलेशन वार्डमधील सर्व सिस्टर चा त्यांच्या उत्तम सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे प्रेसिडेंट रोटरीयन जीआर ठाकूर यांच्या हस्ते एक बेडशीट, सैनीटायझर बॉटल, मास्क, व एक सर्टिफिकेट देऊन पंधरा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
त्याच प्रमाणे दहा कॅज्युअल लेबर कर्मचारी सफाई कामगार यांचाही सैनीटायझर बॉटल आणि मास्क देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर शंकर, अबुस्कर व डॉक्टर विक्रांत सोनार हजर होते या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम लाहोटी होते.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावळ प्रेसिडेंट जी ठाकूर. रोटरी यन सतीश अग्रवाल, राजेश अग्रवाल, महेश भराडे आणि रोटेरियन आरती चौधरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *