भुसावळ (प्रतिनिधी )-
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ
तर्फे कोरोना कर्मयोगी यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये ज्यांनी समाजाची तन-मन-धनाने सेवा केली आहे,
कोरोना रुग्णांची सेवा केली आहे
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य कृतीने आदर्श सेवा केली आहे . अशा रेल्वे हॉस्पिटल भुसावळच्या परिचारिका सिस्टर तिरके, सिस्टर रामोती , सिस्टर करुना , यांचेसह आयसोलेशन वॉर्ड ऑफ रेल्वे हॉस्पिटलच्या सर्व परिचारिकांचा त्यांनी दिलेल्या उत्तम सेवेसाठी सत्कार करण्यात आला. त्यांना सर्टिफिकेट आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
हा प्रकल्प राबविण्यात डॉ शंकर अंबुस्कर, डॉ विक्रांत सोनार , ह्यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रायोजक बी ए लाहोटी चेरिटेबल ट्रस्ट होते .
प्रेसिडेंट शितल भराडे यांनी सर्वांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली होती या प्रकल्पामध्ये सौ आरती चौधरी यांचे सहकार्य लाभले.



