भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील वरणगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांकांचे तालुकाध्यक्ष सईद मुल्लाजी यांनी शिवसेनेची ८० टक्के समाजकार्य व २० टक्के राजकारण ही भावना लक्षात घेवून शिवसेनेचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आदेशाने दिनांक २७ जुलै २०२० रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला . प्रसंगी सर्व शिवसैनिकांचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी भगवा पटका देवून स्वागत केले .
यावेळी जय तोतानी ,अमोल पाटील , स्वप्निल पवार, नंदराज पवार, यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांची समाजकार्याची आवड पाहता अल्पसंख्यांक आघाडीच्या उपजिल्हा संघटक पदी सईद मुल्लाजी यांची निवड शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने जिल्हा संघटक अफसर खान यांनी केले प्रसंगी शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान ,शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे तालुका संघटक धीरज पाटील उपतालुका प्रमुख हिरामण पाटील उपतालुकाप्रमुख श्री समाधान पाटील उपतालुकाप्रमुख सुभाष पाटील उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी भुसावळ शहर प्रमुख निलेश महाजन ,बबलू ब-हाटे , भुसावळ शहर संघटक जग्गू खेराडे ,उपतालुका संघटक प्रकाश कोळी , सुनील कोळी ,ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी , निळकंठ सरोदे , दीपक धांडे अँड कैलास लोखंडे यांचे सह निलेश सुरळकर ,निलेश ठाकूर ,अतुल पाटील ,कैलास पाटील, पंकज पाटील, भूषण बाविस्कर, सागर वंजारी, राहुल बावणे ,सागर लोंढे ,शैलेश पाटील ,दीपक पाटील, मंगेश मराठे ,कृष्णा पाटील ,साई चरण चौधरी ,चिंटू सोनवणे ,मयूर चौधरी ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



