भुसावळ (प्रतिनिधि )-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिराची सुरुवात शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून सदर रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस सोसायटी जळगाव चे सहकार्य लाभणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहायता निधी पाठवणे कामी धनादेश संकलनाचे काम देखील उद्या दिनांक 27 जुलैपासून सुरू होणार आहे. भुसावळ तालुक्यामधून जास्तीत जास्त भरघोस निधी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यासाठी धनादेश संकलनाचे काम पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचेकडे देऊन धनादेश संकलनाची सुरुवात करण्यात येणार आहे .
प्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी वरणगाव येथील हनुमान नगर मधील अभ्यासीके मध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित राहून रक्तदान करावे व मुख्यमंत्री सहायता निधी साठी मुख्यमंत्री सहायता निधी या नावाने शक्य तेवढी रक्कम टाकून धनादेश जमा करावेत असे आवाहन भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख समाधान महाजन तसेच सर्व पदाधिकारी व शिवसेना परिवार भुसावळ तालुका तर्फे करण्यात येत आहे



