भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील नहाटा महाविद्यालयातर्फे आणि एनसीसी मुले विभागातर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती सतर्कता राखून हा दिवस साजरा करण्यात आला. येथील चौफुलीवर असलेल्या शहीद राकेश शिंदे स्मारक यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करुन कार दिल होत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कारण याच दिवशी भारताने पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळविला होता पण यामध्ये आपले खूप सैनिक हुतात्मा झाले होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण कारगिल विजय दिवस साजरा करत असतो.
एनसीसी मुले विभागातर्फे या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भारतीय सैन्याच्या पराक्रमाला उजाळा देण्यात आला व त्यामुळे सर्व उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील,डॉ.बी एच.बऱ्हाटे,डॉ.एन.ई. भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए डी गोस्वामी, लेफ्टनंट डी एन पाटील, व एनसीसी ची मुले हजर होती.



