भुसावळ विभागामध्ये ऑनलाइन रिफ्रेशर कोर्सची परीक्षा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थान भुसावळ मध्ये ऑनलाईनद्वारे रिफ्रेशर कोर्स घेतले जात असून त्यांना ऑनलाईन द्वारे प्रशिक्षण दिले जात असून त्यांची परीक्षा सुद्धा ऑनलाईन द्वारे घेतली गेली .
शनिवार दिनांक २५ जुलै २०२० रोजी वरिष्ठ  मंडळ वाणिज्य  प्रबंधक कार्यालयामध्ये ऑनलाइन रिफ्रेशर कोर्सेची परीक्षा घेण्यात आली . यावेळी सोशल अंतर ठेऊन ही परीक्षा घेण्यात आली .
ही परीक्षा भुसावळ विभागातील तिकिट तपासणी कर्मचारी यांच्या करीता होती . या कोर्से मध्ये एकूण ४० कर्मचारी प्रशिक्षण मध्ये सहभागी होते यामध्ये अनुक्रमे मध्य रेल्वे मधील भुसावळ , मुंबई , पुणे , सोलापूर , नागपूर विभागातील आणि पश्चिम मध्य रेल्वे मधील भोपाळ, कोटा , जबलपूर मधील प्रशिक्षणार्थी होते . ही ऑनलाईन परीक्षा प्रत्येक विभागात घेण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *