मन्‍सुरा काढ्‍याचा लाभ लाखो लोकांना मिळवून देणार-हाजी मुन्‍ना तेली ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
देशभरातच नव्‍हे जगभरात कोरोना संसर्ग मोठ्‍या प्रमाणात सुरू असून मालेगाव पॅटर्न मन्‍सुरा काढ्‍याने मालेगाव परिसरात कोरोना आजारावर मात देता आली असून मन्‍सुरा काढ्‍याचा लाभ लाखो लोकांना मिळवून देणार असल्‍याचे भुसावळ नगरपरिषदेचे गटनेते तथा एम.आय.तेली इंग्रजी माध्‍यम शाळेचे अध्‍यक्ष हाजी मुन्‍ना तेली यांनी सांगितले. यावेळी मुन्‍ना तेली पुढे म्‍हणाले कि,कोरोना आजाराशी प्रतिकार शक्‍ती वाढून कोरोनाशी जनतेला लढा देता यावा हा एकमेव उद्‍देश समोर ठेवून डाॅ.रफीक अहमद,डाॅ.जाकीर व सुमारे ५० जणांच्‍या टिमच्‍या मदतीने उच्‍च प्रतीचा मटेरियल वापरून १० लाख रू.किमतीची मशिन व सुमारे ४० लाख रू.किमतीचे मटेरिअल आणून जळगाव जिल्‍ह्‍यातील लाखो लोकांपर्यंत काढा पोहचविण्‍याचा मिशन आहे व बाहेर जिल्‍ह्‍यात सुध्‍दा हा काढा जात असल्‍याचे हाजी मुन्‍ना तेली यांनी स्‍पष्‍ट केले. सदर काढा ज्‍या युनानी महाविद्यालयाच्‍या संकल्‍पनेतून तयार झाला आहे त्‍या मन्‍सुरा युनानी मेडीकल मध्‍ये शिक्षण घेतलेले महाराष्‍ट्र कौन्‍सील आॅफ इंडियन मेडीकलचे सदस्‍य डाॅ.रफीक अहमद म्‍हणाले कि,या माध्‍यमातून जनतेची सेवेची संधी मिळाली असून मन्‍सुरा काढ्‍याची सुरूवात करणा-या महाविद्यालयातच शिक्षण झाल्‍याचे आनंद आहे.या काढ्‍यात ९ युनानी मटेरिअल टाकण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *