भुसावळ (प्रतिनिधी )-
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे,रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संगनमताने शेकडो तरूणांना बेरोजगार व अनेक गरीबांना बेघर करण्याच्या उद्देशाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग रेल्वेला हस्तांतरण केल्याचे नगरपरिषद जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांनी सांगितले. यावेळी उल्हास पगारे पुढे म्हणाले कि,सत्ताधारींनी रस्त्याचे हस्तांतरण गरीब व ठराविक लोकांना संपवण्यासाठी हा कट रचला होता.रस्त्याचे हस्तांतरण होण्यापुर्वीच रेल्वेने रस्त्यावर पुर्णपणे कब्जा करून दादागिरी केली.प्रशासनाने या रस्त्यावरून केवळ कंडारी गावाचा वापर दाखवला आहे.मुळात या रस्त्यावरून कंडारीसह फेकरी,दिपनगर,आंबेडकर नगर,समता नगर,नालंदा नगर,रेल्वे फिल्टर हाऊस परिसर,चांदमारी चाळ,व्दारका नगर,दादासाहेब रूपवते सोसायटी आदी भागातील नागरिकांचा वापर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



