भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील झुलेलाल मंदिरा समोरील गल्लीत गल्लीची लेवल मुख्य रस्त्या पासून खाली असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी तेथे साचून काहींच्या घरात पाणी शिरत होते.या त्रासाला कंटाळुन लोकांनी मा.नगरसेवक निक्की बत्रा यांचेशी संपर्क साधून रस्ता बनवून देण्याची विनंती केली.निक्की बत्रा यांनी तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली असता लोकांची मागणी रास्त आहे असे त्यांच्या लक्षात आले.लोकांच्या विनंतीला मान देऊन बत्रा यांनी ७५ हजार रू.स्वखर्चाने पेव्हर ब्लॉक लावण्याच्या कामाला सुरुवात केली.यामुळे प्रभागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केले. पुढच्या टप्यात सिंधी कॉलनीतील एल पट्टा भागात पेव्हर ब्लॉकचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन निक्की बत्रा यांनी दिले.



