विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची गरज – सुधारक सनांसे

भुसावळ प्रतिनिधी –
सध्या विद्यार्थी हे मोबाईल कॉम्प्युटर च्या सानिध्यात असल्यामुळे त्यांच्या वर ऑनलाइन अभ्यासाचा ताण पडत आहे या गोष्टीची पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून यावर पर्याय काढला गेला पाहिजे यासाठी रोटरी ताप्ती व्हॅली क्लब यांच्यावतीने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले असून यासाठी शिक्षकांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन रोटरी ताप्ती व्हॅली क्लब चे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे यांनी केले
जिल्ह्यातील शिक्षक मुख्याध्यापक विविध संघटनांचे पदाधिकारी यांची एक दिवसीय ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की ऑनलाइन अभ्यासक्रम ताणतणाव यामुळे विद्यार्थी कुठेतरी त्यांच्या भावना दाबल्या जात आहे त्यांना कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे घराच्या बाहेर पटांगणावरती खेळण्यासाठी मिळत नाही सकाळपासून तर रात्री झोपे पर्यंत त्याच त्याच गोष्टी करून कंटाळा आलेला आहे अशा या परिस्थितीमध्ये पालक व विद्यार्थी यांच्यातील भावना बाहेर पडल्या पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य निर्माण झाले पाहिजे त्यांना विचार करायला भाग पडले पाहिजे व आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी रोटरी ताप्ती व्हॅली क्लब यांच्यावतीने प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवार दोन दिवस अभ्यास सोडून विचारांची मेजवानी मिळावी यासाठी घर बसल्या व त्यांना आमंत्रित करणार आहे यामध्ये हा कार्यक्रम घरोघरी पोहोचविण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मदतीने हा कार्यक्रम पोहोचणार असल्याचे सांगितले

रोटरी ताप्ती व्हॅली क्लबचे जॉईन सेक्रेटरी संजय भटकर यांनी या कार्यक्रमासाठी विचारवंत यांच्या बाबतची माहिती सांगून शनिवार व रविवार दोन दिवस सर्वांसाठी आनंदाचे व आपल्या भावना मोकळे करणारे असणार असल्याचे प्रतिपादन केले

रोटरी ताप्ती व्हॅली क्लबचे सदस्य मुकेश अग्रवाल यांनी सांगितले की विद्यार्थी हा पुस्तकातील ज्ञाना पुरता मर्यादित न होता त्याचा सर्वांगीण विकास या काळात देखील झाला पाहिजे तसेच त्यांच्यामध्ये हे सर्व गुण अंगीकारणे गरजेचे असून यासाठी पालकांचे प्रबोधन देखील होणे गरजेचे आहे आहे म्हणून हा कार्यक्रम सर्वांनी आवर्जून बघावा

जीवन महाजन यांनी हा कार्यक्रम पालक व विद्यार्थ्यांना पर्यंत कशा पद्धतीने पोहोचविला जाईल व त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत ची माहिती ती सांगत फेसबुक वर युट्युब च्या माध्यमातून हा कार्यक्रम बघण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन केले

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश इंगळे यांनी तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *