भुसावळ (प्रतिनिधी ) –
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाचा उल्लेख राज्यसभेत करू नये असे सुचवणाऱ्या भाजपच्या वाईट प्रवृत्तीचा जाहीर निषेध तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आला असून याबाबत तहसीलदारांना २३ जुलै गुरुवार रोजी निवेदन देण्यात आले .
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी ‘असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला त्यावर भाजपाचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या जयघोष यावर आक्षेप घेऊन हे तुमचे घर नसून माझे चेंबर आहे इथे बाकीच्या घोषणा चालणार नाही असे अपमान जनक शब्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरून भाजपाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल असलेला खोटा आदर या प्रकारामुळे उघड झाला आहे अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे हे सर्व जनतेला आता समजून चुकले आहे भाजपाने फक्त मतांसाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आतापर्यंत वापर केलेला आहे याबाबतचा निषेध भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांना जिल्हाप्रमुख यांच्या आदेशाने तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे सर तालुका संघटक प्रा . धीरज पाटील, शहर प्रमुख नीलेश महाजन बबलू ब-हाटे माजी नगरसेवक दीपक धांडे, अँड . कैलास लोखंडे महिला आघाडी पुनम बराटे, महिला तालुकाप्रमुख भुरा चव्हाण , जग्गू खरारे ,अमोल पाटील , यांचेसह शिवसेनेचे तमाम कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
तहसीलदार धिवरे यांचा निवेदन घेण्यास नकार :
तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले असताना बाहेरून आलेल्या तहसीलदार देवरे यांना प्रवेशद्वाराजवळच निवेदन घेण्याची विनंती करण्यात आली परंतु तहसीलदार यांनी शिवसेनेच्या विनंतीस नकार देऊन आपण माझ्या चेंबर मध्ये याअशा उर्मट भाषेत बोलून निघून गेले त्यांच्या या वागणुकीचाही उपस्थित शिवसैनिकांतर्फे निषेध करण्यात आला.



