भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे वरणगाव येथील बस स्टँड चौकात काळ्या फिती लावून भाजप नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी राजांचे नाव यापुढे राज्यसभेत घेऊ नये हे तुमचे घर नाही तर माझे चेंबर आहे अशाप्रकारे माननीय खासदार उदयनराजे भोसले यांना शपथविधी वेळी सुनावनाऱ्या भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांचा शिवसेनेतर्फे काळ्या फिती लावून घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली व वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना गुरुवार २३ जुलै रोजी निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला .
प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन ,शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे ,उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, भुसावळ पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे ,ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, आबा सोनार, निलेश सुरडकर, निलेश ठाकूर ,अतुल पाटील, निखिल चौधरी ,कैलास पाटील ,सागर वंजारी, राहुल बावणे ,विजय कुंभार ,शिवाजी चव्हाण, पंकज पाटील, साई चरण चौधरी, निखिल चौधरी ,मंगेश चव्हाण ,प्रतीक मराठे, देवा भाई यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.



