भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास या तत्त्वानुसार वार्ड क्रमांक एक मधील गणपती नगरातील सुंदर लोकवस्तीमध्ये १४ व्या वित्त आयोगातून रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ जेष्ठ नागरिक श्रीराम सपकाळे व सुरेश सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाहून करण्यात आले.
प्रसंगी वार्ड क्रमांक एकचे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच आनंद ठाकरे ,प्रभाकर सोनवणे , दुसाने, किरण कापसे, गणेश सोनवणे, विक्रम सोनवणे सह वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती
ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्वांगीण रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतलेला असून १४ व्या वित्त आयोगातून धार्मिक स्थळे गावातील प्रमुख चौक तसेच काही छोट्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक बसविण्याचे कामे मार्गी लागलेली असून लवकरच संपूर्ण गावातील रस्ते १०० टक्के काँक्रिटीकरण युक्त होतील अशा पद्धतीचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली असून गाव राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज म्हणून सन्मानित होईल असा विश्वास संपूर्ण सरपंच अनिल पाटील सह समस्त ग्रामपंचायत कमिटी ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे व ग्रामस्थांना आहे यासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे व कर्तबगार भाजपा प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षाताई खडसे आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे



