रोटरी रेल सिटी तर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपण ;

     

रोटरी रेल सिटी तर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपण
भुसावळ-येथील रोटरी रेलसिटी भुसावळ येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात १२ ठिकाणी क्लबचे जेष्ठ सदस्य आ.संजय सावकारे व तहसिलदार दीपक धिवरे यांच्‍या हस्‍ते वड, कडुनिंब,बकुळ,अर्जुनसाल, करंज हे सावली देणारे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी ट्रीगार्ड सुद्धा बसवण्यात आले आहे .या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी कार्यालय कर्मचारी यांनी स्वतः हुन घेतली .या उपयुक्त उपक्रमाचे कौतुक होत आहे . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे, अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा ,सदस्य आशिष अग्रवाल ,मनोज सोनार,सोनू मांडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *