शेळगाव बॅरेज ला महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव द्या:- श्री राजपूत करणी सेना


भुसावळ (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला महापुरुष , महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव देण्यात यावे अशी मागणी आज तहसीलदार दीपक धिवरे यांना श्री राजपुत करणी सेने चे तालुका अध्यक्ष हर्षल पाटील, श्री अभिजित पाटील सोशल मीडिया प्रमुख खान्देश विभाग, यांच्या पुढाकाराने व अशोक पाटील,उपसभापती :- कृषि उत्पन्न बाजार समिती भुसावळ समाधान महाजन,शिवसेना तालुका अध्यक्ष बंटीभैया पाटील, काँग्रेस नेते संजयसिंग चौहान, जेष्ठ पत्रकार व प्रशांतसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी खान्देश उपाध्यक्ष किरण पाटील, तालुका उपप्रमुख चरणसिंग चौधरी भूषण जेथवे, शहर प्रमुख गोपी राजपूत पदाधिकारी उपस्थित होते सरकारी नियमानुसार सोशल डिस्टसिंग व मास्क लावून नियमाचे पालन करण्यात आले. आमच्या राजपूत समाजचे घरे व शेती गेली :- हर्षल पाटील
यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पा साठी आमच्या राजपूत समाजाने त्यांच्या घरे व जमिनी दिल्या आहे व त्यांचे पुनर्वसन सुध्दा वरच्या गावात झाले आहे.तरी आजही आमचा राजपूत समाज विकासापासून वंचित आहे. व अनेक सुखसुविधा पासून वंचित आहे तरी शेळगाव बॅरेज साठी राजपूत समाजाचे मोठे योगदान आहे. तरी या योगदानाला स्मरून त्या प्रकल्प ला हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे नाव द्यावे अशी विनंती व निवेदन तहसीलदार, दिपक धिवरे यांना आम्ही श्री राजपूत करणी सेने च्या वतीने दिले आहे व लवकरच आम्ही मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे व जलसंपदा मंत्री यांना पण निवेदन देणार आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *