देव तारी त्याला … भुसावळचे छायाचित्रकार श्याम गोविंदा अपघातातून सुखरूप बचावले ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील विकास कॉलनी भागातील रहिवासी वरीष्ठ छायाचित्रकार श्याम गोविंदा हे छायाचित्रणाच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असता ऑर्डरचे काम संपल्यानंतर ते चारचाकीने परतत असतांना रोफळेक, ता. माढा, जि. सोलापूर या भागात रस्त्याने
चारचाकी उलटली मात्र सुदैवाने या अपघातात श्याम गोविंदा उर्फ रविंद्र पाटिल हे बालबाल बचावले आहेत.
छायाचित्रणाची ऑर्डर मिळाल्याने ते सोलापूर जिल्ह्यात गेले होते तर ऑर्डरचे काम झाल्यानंतर ते देवी दर्शनासाठी चारचाकीने गेले होते व दर्शनावरून परतत असतांनाच चारचाकी रस्त्याखाली उलटली मात्र सुदैवाने या अपघातात त्यांना काहीही ईजा झाली नाही मात्र चारचाकीचे मोठे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *